बापरे.. बाप..उपमुख्यमंत्री अजितदादा च्या बारामतीत कोरोनाचे नियम धाब्यावर, पी.डी.सी.बँक निवडणूक दरम्यान मोठी गर्दी... बारामती(संतोष जाधव):- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे संचालक मंडळ निवडणूक सन 2020-2025 ची मतदान प्रक्रिया बारामती येथील म ए सो हायस्कूल येथे सुरू होती यादरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्यासमवेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मतदान केंद्रावर आले होते,कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी होणे धोक्याचे होते परंतु त्याठिकाणी असणाऱ्या पोलीस पथकाने गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला की नाही हे असलेल्या गर्दीवरून दिसत होते, एकीकडे सांगायचे सोशल डीस्टेन्स राखा खबरदारी घ्या, मात्र बारामतीत गर्दी करायची याचा जनतेनी काय आदर्श घ्यायचा हीच चर्चा बारामती मध्ये होताना दिसून आली,उपमुख्यमंत्री अजितदादा नेहमी सांगतात की गर्दी करू नका मात्र कार्यकर्ते गर्दीचा घोळका घेऊन फोटो काढण्यात दंग होता,याठिकाणी कायदाचा भंग करण्यात आल्याचे दिसले,दुसऱ्यास शिकवे ज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण! अशी परिस्थिती सद्या बारामतीत पहावयास मिळाली, नियम हा सर्वांना सारखाच असतो मात्र त्याची किती अंमलबजावणी केली जाते हे यावरून दिसून येत आहे.मतदान केंद्रावर आखलेल्या रेषेची मर्यादा न राखता अलोट गर्दी करून एक प्रकारे कोरोनाला आमंत्रण तर नाही ना अशीच चर्चा होताना दिसत होती.या केले गेलेल्या गर्दी ची तक्रार भारतीय जनता पार्टीचे पांडुरंग कचरे व सतीश फाळके हे करणार असल्याचे सांगण्यात आले.
Post Top Ad
Saturday, January 1, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बापरे.. बाप..उपमुख्यमंत्री अजितदादा च्या बारामतीत कोरोनाचे नियम धाब्यावर, पी.डी.सी.बँक निवडणूक दरम्यान मोठी गर्दी...
बापरे.. बाप..उपमुख्यमंत्री अजितदादा च्या बारामतीत कोरोनाचे नियम धाब्यावर, पी.डी.सी.बँक निवडणूक दरम्यान मोठी गर्दी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment