लाच घेताना या तालुक्यातील तलाठ्याला पकडले.. बारामती:- महाराष्ट्रात लाच घेण्याचे प्रमाण वाढत असताना बारामती लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या तहसील कार्यकक्षेत असणाऱ्या तलाठी कार्यालयातील तलाठी लाच घेताना पकडला जातोय ही घटना आहे इंदापूर तालुक्यातील हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या इंदापूर तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. प्रवीण भगत असे या तलाठ्याचे नाव असून ते कुरवली येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत.तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला
होता. हे काम करून देण्यासाठी भगत याने १८ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते.दरम्यान, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर
एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. भगत याने बारामतीतील घरी तक्रारदाराला पैसे बोलावले होते. त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास भगत याच्या घराबाहेर सापळा रचत पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.असाच काहीसा प्रकार बारामती तालुक्यात देखील घडत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले असून याकडे लक्ष जाईल का हे पहावे लागेल.
No comments:
Post a Comment