यशाला गवसणी घालण्यासाठी जिद्द महत्त्वाची- लता करे:
बारामती : येथील निवृत्त हवाई अधिकारी मच्छिंद्रनाथ म्हेत्रे व रागिनी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून दरवर्षी ध्वजारोहन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, यावर्षी सलग तीन वेळा शरद मॅरेथॉन विजेत्या लता करे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले , यावेळी बोलताना त्या म्हणाल्या ' 'आपल्या देशाची संस्कृती ही अनमोल आहे, देशाचा संस्कृतीक वाटा जपण्यामध्ये महिलांचे योगदान हे खूप महत्वपूर्ण आहे, हे योगदान अधिका-अधिक वाढवण्यासाठी महिलांनी जिद्द व पराकाष्ठा अंगी बाळगली पाहिजे, यशाला गवसणी घालायची असेल तर महिलांनी स्वतः स्वावलंबी बनले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आणि त्यांचा जीवन प्रवास सांगितला, लता करे यांच्या जीवनावर आधारित 'लता भगवान करे ' या चित्रपट निर्मिती दरम्यानच्या प्रसंगाविषयी यांच्या सुनेची भूमिका साकारलेल्या राधा चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले,या ध्वजारोहण प्रसंगी विशेषतः समाजातील विविध स्तरातील महिला उपस्थित होत्या.फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू -भगिनींचे स्वागत करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बालवयापासूनच मुलांवर देशप्रेमाचे संस्कार रुजवले पाहिजेत, राष्ट्रीय कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढावा, या दृष्टीने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन निवृत्त हवाई अधिकारी मच्छिंद्रनाथ म्हेत्रे यांनी केले, या कार्यक्रमासाठी सुजाता लोंढे, स्मिता शहा, पूनम कदम, प्रज्ञा ढोले, रेखा कदम, मंगला मेणसे,सौ. शिंदे, सौ, नाळे यांचे योगदान लाभले. हा कार्यक्रम संघवी टाऊननशिप येथे संपन्न झाला.
No comments:
Post a Comment