हॉस्पिटलच्या खोलीमध्ये सापडली चक्क मानवी कवटी आणि हाडे... मालेगाव:- मालेगावमध्ये महापालिकेचे प्रसिद्ध असे वाडिया हॉस्पिटल आहे. सध्या वाडियासह अली अकबर रुग्णालयाची क्षमता
वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही हॉस्पिटलच्या इमारतींचे काम सुरू आहे. हे सारे काम सुरू असल्याने ही खोलीही उघडण्यात आली. तेव्हा कर्मचार्यांना धक्का बसला.
त्यांना खोलीमध्ये चक्क मानवी कवटी आणि हाडे सापडली.ही माहिती वाडियाचे वैद्यकीय अधिकारी हेमंत गढरींना दिली.त्यांनी या प्रकरणाचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांना पाठवला आहे. दरम्यान, या कवटीचा जबडा तुटलेला आहे. हाडाचे दोन्ही भाग तुटलेत.त्यामुळे ते शरीराच्या कोणत्या भागाचे आहे, हे ओळखणे अवघड झाले आहे.वाडिया हॉस्पिटमध्ये पूर्वी एक शवविच्छेदन गृह होते. मात्र,मालेगावमध्ये सामान्य रुग्णालय सुरू झाले आणि येथील शवचिकित्सा बंद झाली. या शवविच्छेदन गृहाशेजारच्या खोलीमध्येच ही कवटी आणि हाडे सापडल्याचे समजते.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्यांनी याप्रकरणाची माहिती महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांना दिली आहे. त्यांनी तातडीने चौकशी करून, पोलिसांमध्ये तक्रार करावी, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मानवी कवटी आणि हाडे कशाची असावीत, याबद्दल नाना तर्कवितर्क लढविले जात आहेत.
No comments:
Post a Comment