बारामती शहर व तालुक्यातील सर्व सरकारी व खाजगी हॉस्पीटल यांनी रुग्ण हक्कांची सनद(द चार्टर ऑफ पेशंट राईटस) दर्शनी भागात लावण्या संदर्भात आदेश* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

बारामती शहर व तालुक्यातील सर्व सरकारी व खाजगी हॉस्पीटल यांनी रुग्ण हक्कांची सनद(द चार्टर ऑफ पेशंट राईटस) दर्शनी भागात लावण्या संदर्भात आदेश*

*बारामती शहर व तालुक्यातील सर्व सरकारी व खाजगी हॉस्पीटल यांनी रुग्ण हक्कांची सनद(द चार्टर ऑफ पेशंट राईटस) दर्शनी भागात लावण्या संदर्भात आदेश*

बारामती:-राज्यातील सरकारी खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईटस) हि सनद मानवी हक्क आयोग भारत सरकार यांनी दि.१३ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या वेबसाईडवर प्रकाशीत केली आहे ही सनद जशीच्या
तशी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी स्विकारलेली आहे तसेच सदर सनद सर्व राज्य सरकार यांना पाठवलेली आहे तसेच राज्य सरकारनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेमार्फत प्रत्येक हॉस्पिटल मध्ये लागू करावी असे निर्देशही
केंद्र सरकारने दिलेले आहे आता राज्य सरकानेही रुग्णालयांना फर्मान सोडले आहे याबाबत उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत निर्णय झाल्याने आरोग्य विभागाने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. परंतु बारामती शहर व बारामती
तालुक्यातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या रुग्णहक्कांची सनद (द चार्टर
ऑफ पेशंट राईटस) दर्शनी भागात लावल्याचे दिसून येत नाही त्यामुळे कोणत्याही पुर्व अटी न लावता व उपचार सुरू करण्याच्या अगोदरच पैशाच्या
मागणी केली जाते व पैशा वाचून कित्येक नागरिक उपचारा वाचून वंचित राहता यामुळे ही सनद सांगते पैशाची मागणी न करता पहिल्यांदा पेशंटला सर्वोत्तम, सुरक्षापुर्व व दर्जेदार तसेच तातडीने वैद्यकीय सेवा देवून पहिल्यांदा रूग्णांचा जीव वाचविणे हॉस्पीटल व डॉक्टरांचे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या कलम २१ प्रमाणे प्रत्येक भारतीयांना जगण्याचा
अधिकार आहे, तो अधिकार कोणत्याही अपत्कालीक परिस्थीतीत प्रधान्याने सुरक्षीत राहिला पाहिजे यासाठी रुग्णांच्या हक्काची सनद लावणे अत्यंत गरजेचे आहे. पुरेशी माहिती मिळण्याचा हक्क, आजाराचा प्रकार, त्यांची कारणे तपासण्यांचे तपशील,काळजी, उपचारांचे परिणाम, त्यामुळे होणारी गुंतागुंत आणि अपेक्षित खर्च, रूग्णांच्या नोंदी, केसपेपर, तपासण्यांचे अहवाल आणि सविस्तर बिले मिळण्याचा हक्क, उपचारासाठी माहितीपुर्ण संमतीचा हक्क, रूग्णाने निवडलेल्या डॉक्टरांकडून सेकंड ओपिनियन मागविण्याचा हक्क, उपचारांदरम्यान गोपनीयता, खासगीपणा तसेच मानवी प्रतिष्ठा जपण्याचा हक्क, पुरूष डॉक्टरांकडून महिला रूग्णाची तपासणी होत असताना स्त्री कर्मचारी वा नातेवाईक सोबत असण्याचा हक्क, एचआयव्ही बाधित असल्यास भेदभावरहीत उपचारांचा आणि वागणुकीचा हक्क, पर्यायी उपचारपध्दती निवडण्याचा हक्क हे रूग्णहक्क
सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईटस) मध्ये असणे अपेक्षित आहे, तरी सदरील रुग्णांच्या हक्कांच्या सनदी बारामती शहर व तालुक्यातील सर्व खाजगी व
सरकारी हॉस्पीटलने अघ्याप लावलेल्या नसल्याने मंगलदास निकाळजे यांनी रुग्णहक्कांची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईटस) हॉस्पीटलच्या दर्शनी भागात लावण्याचे सर्व सरकारी व खाजगी हॉस्पीटल यांना त्वोरीत आदेश द्यावेत व त्याबाबत उपाय योजना राबवाव्यात अन्यथा  बारामती शहर व तालुक्यातील जनतेला सोबत घेवून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात इशारा देताच प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी संबंधिताना आदेश काढले आहेत. या पुढे देखील जो पर्यंत रुग्णांच्या हक्काच्या सनदी प्रत्येक्षात लावण्यात येत नाहीत तोपर्यंत लढा लढणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे जिल्हा मुख्य प्रचार प्रमुख  मंगलदास निकाळजे यांनी सांगितले त्यावेळी वंचित आघाडीचे तालुका महासचिव विक्रम थोरात, रणजित खोमणे, अक्षय चव्हाण, संदिप केसकर, कृष्णा शिरसागर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment