भीमाशंकर साखर कारखान्यावर ध्वजारोहन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 25, 2022

भीमाशंकर साखर कारखान्यावर ध्वजारोहन

भीमाशंकर साखर कारखान्यावर ध्वजारोहन 

भीमाशंकर:- दत्तात्रयनगर पारगाव ता आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात ७३ वा प्रजासत्ताक दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मोजक्याच लोकांच्या उपस्थीती मध्ये साजरा करण्यात आला .
कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली. या वेळी कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली. द. गो.  वळसे पाटील महाविद्यालयात कारखान्याचे संचालक  प्रदीप वळसे पाटील व दोन विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली गावडे , संचालक प्रदीप वळसे-पाटील , बाळासाहेब घुले , रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दगडू मारुती शिंदे, शांताराम हिंगे, बाळासाहेब थोरात , ज्ञानेश्वर आस्वारे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर  शिरीष सुर्वे  , सेक्रेटरी रामनाथ हिंगे, चिफ अकौटंट राजेश वाकचौरे , ब्रिजेश लोहोट, अनिल बोंबले , चंद्रशेखर मगर, प्रमोद पाटील , सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे , बी डी चव्हाण सर , प्राचार्य शत्रुघ्न थोरात, वसंत जाधव,  ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते 


No comments:

Post a Comment