अवैधपणे क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणारे चालक,मालक संबंधित कारखाने यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची रिपाई ची मागणी.. बारामती:- दि. 18/1/2022 रोजी अवैधपणे क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणारे चालक,मालक संबंधित कारखाने यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे याबाबतचे लेखी मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,बारामती यांना मा.अभिजित कांबळे(शहराध्यक्ष)यांच्या अध्यक्षतेखाली रिपाइं (आठवले)शिष्ट मंडळामार्फत देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणारे चालक-मालक संबंधित कारखाने यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना प्रकाश परिवर्तक (रिफ्लेक्टर रेडियम) बसवावेत. अपघात झाल्यास ऊस वाहतूक करणारे चालक-मालक संबंधित कारखानदार यांना जबाबदार धरून यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ऊस वाहतूक करणारी वाहने निष्काळजीपणे रस्त्यांवर उभी करणारे अथवा पार्किंग करणारे चालक-मालक संबंधित कारखानदार यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) बारामती मार्फत आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा स्वरूपाचे लेखी पत्र देण्यात आले.यावेळी मा.अभिजित कांबळे (शहराध्यक्ष), मा. सुनील शिंदे (पुणे जिल्हा सचिव) मा.रविंद्र (पप्पू)सोनवणे(पुणे जिल्हा युवक सरचिटणीस) मा. संजय वाघमारे (तालुका सरचिटणीस) मा. मोईन बागवान तसेच मा.शुभम चव्हाण सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment