बारामतीत शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी ४०० ते ५०० महिलांना साडी वाटप..
बारामती:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६ वी जयंती निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम करून, बारामतीत शिवसेनेचे बारामती शहरप्रमुख पप्पू माने(वस्ताद)यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या
जयंतीनिमित्त कष्टकरी व शेतमजूरी करणार्या तब्बल ४०० ते ५०० महिलांना साडी वाटप करण्यात आले.प्रत्येकवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते.पण मागील २ वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत आहे.बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये शिवसैनिकांकडून विविध उपक्रम
राबवले जात असतात.यामध्ये रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश असतो.याच पार्श्वभूमीवर बारामतीत शिवसेनेच्या वतीने व वस्ताद पप्पू माने मित्र परिवाराच्या वतीने महिलांना साडी वाटप करण्यात आले.त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे मात्र
बारामती शहरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.यावेळी शिवसेना पुणे जिल्हा समनव्यक भिमराव भोसले(आप्पा),शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी बारामती अध्यक्षा ज्योती गाडे ,महिला कार्यकर्त्या सुनीता खोमणे,सामाजिक कार्यकर्त्या जया गुंदेचा,अरुणा जाधव व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment