नारायण शिरगावकर सहाय्यक आयुक्त यांचीपुण्याच्या गुन्हे शाखेत नियुक्ती... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 31, 2022

नारायण शिरगावकर सहाय्यक आयुक्त यांचीपुण्याच्या गुन्हे शाखेत नियुक्ती...

नारायण शिरगावकर सहाय्यक आयुक्त यांची
पुण्याच्या गुन्हे शाखेत नियुक्ती...                                                                                                पुणे : बारामती मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून परिचित असणारे व सद्या सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पुणे कार्यरत होते,  नारायण शिरगावकर यांची नियुक्ती गुन्हे शाखेत करण्यात आली आहे. सध्या नारायण शिरगावकर हे विश्रामबाग विभागात आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. गुन्हे शाखेतील सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे हे आज (दिे. 31 जानेवारी) सेवानिवृत्त झाले.या ठिकाणी गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त शिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश सह आयुक्त डॉ. रवींद्र यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने काढले
आहेत. या पदावर सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांनी यापुर्वी पुणे ग्रामीण मधील  बारामती तसेच बीड जिल्ह्यात आणि इतर काही ठिकाणी कर्तव्य बजाविले आहे.सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे हे आज सेवानिवृत्त झाले आहेत.
सहाय्यक आयुक्त शिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आले आहे.
एसीपी यांनी आतापर्यंत
अनेक क्लिष्ट गुन्हयांचा तपास केला आहे.
दरम्यान, अनेक गंभीर गुन्हयांची उकल देखील
त्यांनी केली आहे.
बीड येथे कार्यरत असताना त्यांनी सराईत गुन्हेगारांविरूध्द धडक मोहिम सुरू करून
अनेकांना गजाआड केले होते. आजही बारामतीत त्यांचे नाव निघत आहे.

No comments:

Post a Comment