प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 26, 2022

प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना 
 
 बारामती, दि. २६:  भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती येथील रेल्वे मैदानावर
 प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली. 
             तत्पूर्वी  संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.  
  यावेळी  नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, एकात्मिक पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष  संभाजी होळकर, स्वातंत्र्य सैनिक, निवासी नायब तहसीलदार विलास करे, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्ताराधिकारी, शहरातील मान्यवर व नागरीक उपस्थित होते.
   प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे  यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

                                    

No comments:

Post a Comment