चार चाकी वाहनाचा आरसा डोक्यात लागल्याने नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 25, 2022

चार चाकी वाहनाचा आरसा डोक्यात लागल्याने नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू

निरगुडसर : प्रतिनिधी :( प्रा. अरुण गोरडे.):-
दि :२६/०१/२०२२.जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील लोणी मंचर रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या चार चाकी वाहनाचा आरसा डोक्यात लागल्याने नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना दिनांक 25/1/2022 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तनिष्का नवनाथ ढोबळे वय 9 रा.जारकर वाडी घोडखाना ता.आंबेगाव पुणे ) या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नवनाथ महादू ढोबळे यांनी फिर्याद दिली असून वाहन चालक शरद बन्सी थोरवे रा. शिरोली बुद्रुक ता. जुन्नर जिल्हा पुणे याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 25/1/2022 रोजी फिर्यादी शरद नवनाथ ढोबळे यांची मुलगी तनिष्क ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळे वाडी येथून पिकअप मधून बसून दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घरी येत असताना घरा जवळील रोडवर आली होती पिकअप गाडीतुन उतरल्यानंतर पिकपच्या मागच्या बाजूने घराकडे येण्यासाठी रस्ता ओलांडत असताना तिला भरधाव येणाऱ्या हुंडाई क्रेटा एम.एच.14 एच.क्यू 8199 या वाहनाचा आरसा मुलीच्या डोक्यात जोरात लागल्याने अपघात होऊन या अपघातात झाला होता. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक खैरे करत आहे.
______________________

No comments:

Post a Comment