पोलिसांना धक्काबुक्की.. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 23, 2022

पोलिसांना धक्काबुक्की.. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल.

पोलिसांना धक्काबुक्की.. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल.
फलटण(प्रतिनिधी):- सरकारी कामात अडथळा आणल्याकामी तिघांवरगुन्हा दाखल झाला या बाबत माहिती अशी की, नुकताच कोर्टाची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस हवलदार यांना धक्काबुक्की,शिवीगाळ दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी झिरपवाडी
ता.फलटण येथील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि.21.01.2022 दुपारी 1.40 वा.सु मौजे झिरपवाडी ता फलटण जि सातारा गावचे
हद्दीत श्री सदगुरू यशवंत बाबा गोपालन संस्था
झिरपवाडी ता. फलटण या संस्थेचे इमारतीचे दर्शनी बाजूचे भिंतीलगत पो. ह. साबळे व पो.ना.घाडगे हे मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी
सो फलटण जि सातारा यांचेकडील फौजदारी
न्यायालय फलटण दिनांक 20.1.2022 चे पत्र इसम नामे सदाशिव जालिंदर कुंभार रा.झिरपवाडी ता फलटण जि सातारा यांना
दोन पंचासमक्ष बजावणी करीत असताना त्याने घेणेस नकार दिल्याने सदर नोटीस नमूद संस्थेच्या इमारतीचे दर्शनी बाजूचे भिंतीवर दोन
पंचासमक्ष चिटकवत असताना पो. ह. साबळे व
पो.ना.घाडगे यांना शिवीगाळ दमदाटी करून म्हणत होता की फलटणचे पोलीस हरामखोर आहेत . ते मला सारखेच संस्थेवर येवून त्रास देतात मी त्यांच्याकडे बघून घेतो असे म्हणून पो. ह.साबळे व पो.ना.घाडगे यांना पंचासमक्ष सरकारी काम करीत असताना पो.ना.घाडगे
यांचे अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करून त्यांचे अंगावरील सरकारी गणवेशाचे उजवे बाजूचे खांदयावरील लुप्स मुठ्ठीत धरून हिसका मारून त्यामधील स्टीलचे म - पो बँच
तोडले . व त्याचे सोबत असलेले दोन अनोळखी
मुले आम्ही करीत असलेल्या कार्यवाहीचे फोटो व
व्हिडिओ शुटींग काढणेच्या निमित्ताने आम्हाला
आमचे करीत असले सरकारी काम करून देत
नव्हते म्हणून माझी भादविस क 353, 188 ,
34 प्रमाणे सदाशिव जालिंदर कुंभार रा
झिरपवाडी ता फलटण जि सातारा व दोन
अनोळखी मुले नाव गाव माहीत नाही
यांचेविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद
पोलीस हवालदार बबन साबळे यांनी दिली
आहे.

No comments:

Post a Comment