गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जुलै २०२१ मध्ये पारगाव येथील पोलिस ठाण्यास प्रशासकीय मान्यता.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 29, 2022

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जुलै २०२१ मध्ये पारगाव येथील पोलिस ठाण्यास प्रशासकीय मान्यता..

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जुलै २०२१ मध्ये पारगाव येथील पोलिस ठाण्यास प्रशासकीय मान्यता..                                                                                  निरगुडसर : प्रतिनिधी :( प्रा. अरुण गोरडे.):- दि:२९/०१/२०२२.आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पारगाव येथील प्रस्तावित नवीन पोलिस ठाण्याच्या जागेची उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी पाहणी केली.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जुलै २०२१ मध्ये पारगाव येथील पोलिस ठाण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये या पोलिस ठाण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित पोलिस ठाण्यात विविध संवर्गातील नियमित एकूण ५५ पदे निर्माण करण्यासह चार कोटी ५९ लाख ९१ हजार ९३२ रुपये निधीसह सरकारने मंजुरी दिली आहे.प्रस्तावित पोलिस ठाण्यासाठी भीमाशंकर साखर कारखाना रस्त्यावर अष्टविनायक महामार्गालगत जागेची पाटील यांनी पाहणी केली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर अस्वारे, माजी उपसरपंच विठ्ठल सीताराम ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम वैद, मंडलाधिकारी व्ही.एम.शिंदे, तलाठी संतोष जोशी, सुधीर ढोबळे, सुभाष पंडित उपस्थित होते.

No comments:

Post a Comment