*तुकाराम दादासाहेब झांबरे (बापू) यांचे अल्पशा आजाराने निधन*
बारामती: - महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांचे सासरे तुकाराम दादासाहेब झांबरे (बापू) (रा. बारामती) यांचे शनिवारी (ता.२२) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते.
ते बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक होते. तसेच तुकाराम बापू झांबरे हे प्रसिद्ध अडती म्हणून शेतकरी वर्गात त्यांचा मोठा नावलौकिक होता. त्यांच्या निधनाने शेतकरी वर्गात व अडत व्यापाऱ्यामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे व कन्या भाग्यश्री हर्षवर्धन पाटील असा परिवार आहे.
*शोकाकुल* झांबरे परिवार, बारामती
No comments:
Post a Comment