.भैरवनाथ विघालयाचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश.
लोणी-धामणी : प्रतिनिधी.
(कैलास गायकवाड.):- दिः०९/०१/२०२२. लोणी (ता.आंबेगाव ) येथील श्री.भैरवनाथ विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यामिक विद्यालयातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेत तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. त्यांचे विद्यालय तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सर्व सभासद व ग्रामस्थांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.अशी माहिती प्राचार्य अरुण साकोरे यांनी दिले आहे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी सफा मोहम्मद हनीफ मोमिन(१८०),साहिल संदीप गायकवाड(१७४), वैष्णवी सुरेश वाळुंज(१६०) या विद्यार्थ्यांना प्राचार्य अरुण साकोरे, गैरी यादव,शरद नळकांडे यांनी मार्गदशन केले.विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष फुलफगर, सचिव निकम तसेच माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे सर्व पदाधिकारी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. _________________________
No comments:
Post a Comment