आंबेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा !
_________________________
निरगुडसर : (प्रतिनिधी-प्रा. अरुण गोरडे.):-
दिः२९/०१/२०२२.राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण संस्था ह्या राष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा " पर्यावरण संरक्षण व संवर्धन पुरस्कार २०२२" आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी गावचे सुपुत्र व नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त मा.सुरेशरावजी सावळेराम मेंगडे (IPS) यांना महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते व केंद्रीय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत शनिवार( दि :२९) रोजी राजभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
पोलीस उपायुक्त सुरेशरावजी मेंगडे यांनी महाराष्ट्र व भारतातील विविध ठिकाणी पोलीस सेवेत कार्यरत असताना १५ वर्षे सातत्याने पर्यावरण संवर्धनासाठी भरीव कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
_______________________
No comments:
Post a Comment