गुणवडी च्या दारू भट्टीवर बारामती शहर पोलिसांच्या छापा
बारामती:- सहाय्यक उपनिरीक्षक संजय जगदाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की. अंबादास यशवंत चव्हाण व लक्ष्मी यशवंत चव्हाण. हे विद्यानगरी गुणवडी येथील रहिवासी असून ते वारंवार दारू भट्टी लावून दारू गाळप करीत असतात सदरची माहिती त्यांनी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना दिली. सदरच्या इसमांच्या वर पोलिसांची वारंवार कारवाई होते म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी हे जागा बघून हातभट्टी लावतात. पोलिसांनी एक गोपनीय बातमीदार त्याठिकाणी पाठवून वरील दोघांचा दारू भट्टी अड्डा कुठे आहे हे पाहणी केली असता अशोक ओवेकर यांच्या जागेमध्ये सुभाबळीच्या बेटांमध्ये त्यांनी दारूभट्टी लावलेली होती. सदर दोघे त्या ठिकाणी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भट्टी पेटवून दारूची गाळप करत होते. त्याच वेळेस त्या ठिकाणी दोन पंचा समोर सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे पोलीस उपनिरीक्षक ढाकणे पोलीस कर्मचारी संजय जगदाळे कल्याण खांडेकर दशरथ कोळेकर तुषार चव्हाण बंडू कोठे व महिला पोलीस अंमलदार सुनंदा माने यांनी त्या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी एकूण. दोन दोनशे लिटर मापाचे प्लास्टिक बॅरल ज्यामध्ये चारशे लिटर तयार रसायन तसेच 15 लिटर गावठी दारू प्लास्टिक कॅनमध्ये तसेच दारू गाळपासाठी ठेवलेले लोखंडी कढईत चारशे लिटर द्रावण विषारी नवसागर दहा किलो काळा गूळ व नशा येण्यासाठी बॅटरी सेल फोडून वापरण्यासाठी फोडलेले 10 बॅटरी सेल त्याठिकाणी मिळून आले. असा एकूण दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणावरून पोलिसांनी जप्त करून तो नाशिवंत असल्याने जागीच नाश केला त्यामधून रासायनिक तपासणी साठी पाठवण्यासाठी शांपल घेण्यात आली. त्याठिकाणी सदरचे वरील साहित्य जे मिळाले ते शरीराला अपायकारक असून शरीराला विषारी आहेत म्हणून या केस ला भादवि कलम 328 ज्यामध्ये दहा वर्ष शिक्षा आहे असे कलम लावून तसेच दारूबंदी कायदा कलम 65 व प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जे लोक यांना भट्टी लावून देतात त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
No comments:
Post a Comment