पोलीस उपनिरीक्षकाची धरली गचंडी,'तू कोणकुठला, PSI तुझ्या घरी,इथं शहाणपणा करायचानाही..'' असे म्हणत केली मारहाण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 23, 2022

पोलीस उपनिरीक्षकाची धरली गचंडी,'तू कोणकुठला, PSI तुझ्या घरी,इथं शहाणपणा करायचानाही..'' असे म्हणत केली मारहाण..

पोलीस उपनिरीक्षकाची धरली गचंडी,'तू कोण
कुठला, PSI तुझ्या घरी,इथं शहाणपणा करायचा नाही..'' असे म्हणत केली मारहाण..                                                                    पुणे:- पोलीस जनतेचे रक्षक आहे व ते आपल्या साठी अहोरात्र काम करीत असतात मात्र काही भागात चक्क अश्या पोलिसांवर हल्ले होत आहे, अशीच काहीशी घटना घडली,मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला अडवून पोलीस उपनिरीक्षकाची गचांडी धरुन हाताने मारहाण करुन आरोपीला पळून जाण्यास मदत करण्याचा प्रकार तुळापूर  येथे घडला. याबाबत लोणीकंद पोलिसांनी  सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी गुन्हा केला असून संपत बबन शिवले(वय ४१, रा.तुळापूर) याला अटक केली आहे.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे  यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणीकंद पोलीस ठाण्यात शस्त्राचा वापर करुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यातील आरोपी तेजस साळवे, चंद्रकांत पोपट शिवले,राम पोपट शिवले (सर्व रा. तुळापूर) यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे,पोलीस हवालदार पांडुरंग माने, अंमलदार बाळासाहेब तनपुरे हे तुळापूरला शनिवारी दुपारी गेले होते. भट्टीवस्तीजवळील क्रिकेट मैदानाजवळ त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करत असताना संपत शिवले, राम पोपट शिवले यांनी "तू कोण कुठला, पी एस आय, तुझ्या घरी इथ शहाणपणा करायचा नाही सोड मला तू कमिशनर जरी असला तरी मला काय" असे म्हणत त्याने फिर्यादीची गचांडी धरून समोर ओढले. संपत शिवले याने "तू कोण, तुझा काय संबंध" असे म्हणून गोरे यांच्या अंगावर येऊन हाताने मारु लागला. तेव्हा ते बाजूला सरकले असताना त्यांच्या डोळ्यावरील चष्मा खाली पडला. फिर्यादी यांनी "आम्ही पोलीस असून आरोपी ताब्यात घेत आहोत. सरकारी काम चालू आहे. आपणमध्ये पडु नका आम्हास
सहकार्य करा," असे सांगूनही आरे रावी करीत आलें.फिर्यादीच्या त्यांच्याबरोबरच्या पोलिसांना त्याला मागे ओढून ठेवले तरी देखील शिवीगाळ करुन धमकी दिली. या गडबडीत तेजस साळवे हा पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी दोघांवर सरकारी अंगावर धावून कामात अडथळा आणल्याचा गुन्हा  दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment