महावितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 हजार रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहाथ... पुणे :- महाराष्ट्रात सद्या लाचखोरीचे प्रमाणात वाढ होत असल्याचे अनेक वृत्त पत्रातून आलेल्या बातमीवरून दिसत आहे, तर नुकताच इलेक्ट्रिक
ठेकेदाराकडून ग्राहकांचे ओपन प्लॉटमध्ये
ट्रांसफार्मर कनेक्शन घेण्यासाठी चे अंदाजपत्रक तयार करुन ते पुढील कार्यालयास पाठवण्यासाठी महावितरण कंपनीच्या उरुळी कांचन उपविभागातील उप कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
पुणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने कारवाई गुरुवारी (दि.10) केली. प्रदीप वासुदेव सुरवसे(वय-48) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे इलेक्ट्रिक ठेकेदार असून त्यांच्याकडील ग्राहकांचे ओपन प्लॉटमध्ये ट्रान्सफार्मर कनेक्शन घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन ते पुढील कार्यालयास पाठवायचे होते. यासाठी प्रदीप सुरवसे याने तक्रारदार यांच्याकडे 25 हाजार रुपयांची लाच मागितली.तडजोडीमध्ये 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पथकाने पडताळी केली.त्यावेळी प्रदीप सुरवसे याने तक्रारदार यांच्याकाडे 20 हजार लाच मागितल्याचे
निष्पन्न झाले.पथकाने सापळा रचून प्रदीप सुरवसे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले.आरोपी प्रदीप सुरवसे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या लाचलुचपत
मार्गदर्शनाखाली पुणे प्रतिबंधक विभागाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सीमा आडनाईक करीत आहेत.
No comments:
Post a Comment