'आता तुझी विकेट काढतो!माझ्यावर 307 केली होती ना, सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने वार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 16, 2022

'आता तुझी विकेट काढतो!माझ्यावर 307 केली होती ना, सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने वार..

'आता तुझी विकेट काढतो!माझ्यावर 307 केली होती ना, सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने वार..

पुणे : मनातला राग प्रत्यक्षात आला याचा प्रत्यय नुकताच आला, "तुझ्यामुळे मी ३ महिने जेलध्ये गेलो, तु माझ्यावर ३०७ केली होती. आता तुझी मस्ती काढतो. आज तुझी विकेटकाढतो,"असे म्हणून एका सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी त्याच्यावर दुसर्यांदा खूनाचा प्रयत्न (कलम ३०७) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.रोहित गद्रे ( रा. दापोडी) व त्याचे दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक तुकाराम मोरे (वय 30,रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बोपोडीतील शिवाजी गार्डन येथील गंगाम्मा चायनीज जवळ सोमवारी रात्री अकरा वाजता घडली. फिर्यादी व त्यांचा मित्र निखिल गायकवाड हे शिवाजी गार्डन चायनिजजवळ गेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा रोहीत गद्रे हा त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. तो फिर्यादीला
म्हणाला की, "माझ्याकडे काय बघतो .
तुझ्यामुळे मी तीन महिने जेलमध्ये गेलो. तू
माझ्यावर ३०७ केली होती ना. तुला मस्ती
आली आहे ना. तुझी मस्ती काढतो. आज तुझी
विकेट काढतो," असे बोलून त्याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला.सुदैवाने फिर्यादीने डावा हात मध्ये घातल्यामुळे कोयत्याने डाव्या हाताला जखम झाली.येथील गंगाम्मा इतर आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. कोयते हवेत फिरवून मोठ मोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली.त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस निरीक्षक भाबड  तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment