45 हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिकला अँटी करप्शनने पकडले रंगेहाथ...
धुळे : महाराष्ट्रात सद्या लाचलुचपत विभागाचे कारवाईचे सत्र चालू असून या कारवाईचा वाढत चालला आहे, त्यातच नुकताच धुळे प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्यासाठी 45
स्वीकारणारा कनिष्ठ लिपिक धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा जात पडताळणी समितीतील कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ याला
एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे.धुळे शहरातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने 2017 साली जात प्रमाणपत्र घेतले आहे.
जात वैधता मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित विभागात अर्ज दिला होता. यासोबतच मूळ जात प्रमाणपत्रही दिले होते,पण हे जात प्रमाणपत्र हरवल्याचे सांगण्यात आले.आता त्यामुळे तक्रारदाराने जात प्रमाणपत्रांची दुर्यम प्रत द्यावी अशी मागणी केली.मोबदल्यात कनिष्ठ लिपिक विजय वाघ यांनी 50 हजारांची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने विभागाकडे तक्रार दिली होती.त्याच्या धुळे लाचलुचपत प्रतिबंधक दरम्यान, या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सापळा रचला गेला. सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळील रस्त्यावर तडजोडीअंती 45 हजारांची लाच घेताना विजय वाघ यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment