पंचायत समिती मध्ये 500 रुपयाची लाच घेताना कनिष्ठ सहाय्यकला अँटी करप्शनने पकडले रंगेहाथ.. पुणे :यशवंत घरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी 500 रुपये लाच स्विकारताना इंदापूर पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक अश्विनी गणेश भोंग (वय-36) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई शुक्रवारी (दि.18) पंचायत
समितीमध्ये केली.याबाबत 33 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी (दि.17) तक्रार केली. तक्रारदार हे यशवंत घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेचा 20 हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी अश्विनी भोंग यांनी तक्रारदार यांच्याकडे 500 रुपये लाच
मागितली. तक्रारदार यांनी पुणे लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरुन पुणे एसीबीने गुरुवारी पडताळणी केली. शुक्रवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 500 रुपये लाच स्विकारताना अश्विनी भोंग यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर इंदापूर पोलीस दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे ,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.
No comments:
Post a Comment