धक्कादायक.. 65 वर्षीय वृद्धेवर बलात्कार.. घटना उघडकीस ... नागपूर:-महाराष्ट्रात नेमके चाललंय काय सतत अत्याचार झाल्याचा बातम्या प्रसिद्ध होत आहे मात्र यासाठी कडक पाऊलं उचलली जात नाही की काय परत परत अश्या घटना घडत आहे असा सवाल नागरिक करीत आहे,असाच काहीसा धक्कादायक प्रकार नागपुरात
सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे सामुहिक बलात्काराची पहिली घटना 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीसोबत घडली असून सामूहिक बलात्काराची दुसरी घटना 65 वर्षाच्या एका वृद्ध महिलासोबत घडली आहे.या घटनांमुळे राज्याची उपराजधानी हादरली आहे.नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत लावा परिसरात राहणार्या एका 65 वर्षीय वृद्धेवर बलात्कार करण्यात आला. या पीडित वृद्धेच्या घरी पहाटेच्या
सुमारास दोन अनोळखी आरोपींनी प्रवेश केला.
दोघांनी एकट्याच राहणार्या वृद्धेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने गुरुवारी वाडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली.त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेबद्दल पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती देण्यास पोलीस तयार नाहीत तर दुसरीकडे अश्या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment