रेशनच्या तांदळाचा काळाबाजार,पोलिसांकडून 97 लाखांचा 800 क्विंटल तांदूळ जप्त तर 6जण अटक...
पुणे : महाराष्ट्रात सद्या रेशनिंगचा काळाबाजार जोरात चालू असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कारवाई देखील केली तर काही ठिकाणी चोरून अजूनही काळाबाजार चालू आहे, नुकताच पुण्यातील हडपसर परिसरामध्ये पुणे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.रेशनिंगच्या दुकानात वाटप केला जाणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या सहा जणांना अटक करुन 97 लाख 44 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई हडपसर येथील 15 नंबर येथे केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 ट्रकसह 800 क्विंटल तांदूळ जप्त केला आहे, मोहंमद इरफान मेहमुदुल हसन अन्सारी(वय-32 रा. मौलवीगंज, जि.धुळे,इरफान शेरु शेख (वय-28 रा.मज्जिद इसाक नंदी रोड, जि. धुळे), मोहंमद आसिफ अब्दुल लतीफ अन्सारी (वय-30 रा. सौ फुटी रोड, जि.
धुळे), शेख जावेद रहिम (वय-44 रा.
वर्लभनगर, धुळे), मोहंमद इब्राहिम अब्दुल
जब्बार (रा. अकबर चौक, जि. धुळे), मुस्तकीम
इस्माईल शहा (वय-23 रा. चांदतारा चौक,
मरकत मस्जिद, जि. धुळे ) असे अटक
करण्यात आलेल्या ट्रक चालक व क्लिनर यांची
नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.त्यावेळी 15 नंबर हडपसर येथे ट्रक क्रमांक एमएच 18 बी. ए. 7725, एमएच 18 बी.जी.0053, एमएच 18 बी. जी 5859 या तीन ट्रकमध्ये रेशनिंगचा तांदूळ असून तो छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात बेकायदेशिररीत्या
घेऊन तो रायगड जिल्ह्यातील खोपोली विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती
मिळाली.त्यानुसार पोलिसांनी तीन टीम तयार करुन दोन पंचासमक्ष ट्रक ताब्यात
घेतले.पोलिसांनी ट्रक चालक व क्लिनर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी ट्रकमध्ये तांदूळ असल्याचे सांगितले.हा तांदूळ श्री कनकलक्ष्मी अँग्रो ट्रेडर्स अेपीएमसी यार्ड सीबीएस गुंज गंगावटी जिल्हा कोपल राज्य कर्नाटक या गोडावूनमधून घेतला असल्याचे सांगितले.तसेच हा तांदूळ रेशनिंगचा असून तो रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील जय आनंद फुड इंडस्ट्रीज येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली.पोलिसांनी दाखल करुन तिन ट्रक आणि ट्रकमधील 800 क्विंटल तांदूळ जप्त केला.हडपसर पोलीस ठाण्यात ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले पोलीस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे पोलीस अंमलदार किशोर वग्गु, संजय जाधव,
मोहसीन शेख, साधना ताम्हाणे, उत्तम तारु,
चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने,निखील जाधव, समिर पटेल, कादीर शेख,मितेश चोरमोले, नवनाथ राख यांनी केली
No comments:
Post a Comment