पिकअप टेम्पोचा पाठीमागचा टायर फुटल्याने टेम्पो पल्टी, एकाचा मृत्यू, इतर जखमी.. लोणी-धामणी : प्रतिनिधी( कैलास गायकवाड):- दिः१२/०२/२०२२. लोणी (ता.आंबेगाव ) ते पाबळ ( ता. शिरूर) ररत्यावर शुक्रवार (दिः११) रोजी सायंकाळी पाच वाजता लोणी हद्दीत हॉटेल परंपरा जवळील वळणावर पिकअप टेम्पोचा पाठीमागचा टायर फुटल्याने टेम्पो पल्टी झाला व एका तीस वर्षे वयाच्या युवकाचा मृत्यू झाला झाला.तर इतर जखमी झाले. सदर समजलेली माहिती आशी कि दत्ता अशोक चाटे ( शिरापुर,ता.पारनेर.जि.अहमदनगर) हा पिकअप टेम्पोत दोन बैल व बारा-तेरा जणांना घेउन पाबळ लोणी मार्गे शिरापूर येथे चालला होता.ड्रायव्हर पिकअप भरधाव वेगाने चालवत होता.टेम्पो लोणीकडे जात असताना परंपरा हॉटेल जवळ पिकअपचा पाठिमागील टायर फुटल्याने अपघात होवून फिकअप रोडवर पल्टी झाल्याने अपघतात झाला व त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.व पिकअपमधील अन्य प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले.त्या सर्वांना मंचर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असून पुढील तपास मंचर पोलिस स्टेशनचे हवालदार संजय नाडेकर करत आहेत. बेल्हे (ता.जन्नर ) ते जेजूरी (ता.पुरंदर ) या रस्त्याचे काम लोणी-खडकवाडी ते पाबळ पूर्ण झाले असून हा रस्ता अगदी सूपर झाला आहे. त्यामुळे सर्वच वाहन चालक वाहन चालविताना अगदी वेगात चालवितात व आपल्या जिवाशी खेळतात.अपघाताचे प्रमाण वाढल्याने बांधन वस्ती ( लंकेवस्ती फाटा ) या ठिकाणी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधकही बसवला पण वाहनाचा वेग काही कमी होईना. त्यामुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे.
Post Top Ad
Saturday, February 12, 2022
Home
ताज्या घडामोडी
लोणी धामणी
पिकअप टेम्पोचा पाठीमागचा टायर फुटल्याने टेम्पो पल्टी, एकाचा मृत्यू, इतर जखमी..
पिकअप टेम्पोचा पाठीमागचा टायर फुटल्याने टेम्पो पल्टी, एकाचा मृत्यू, इतर जखमी..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment