तहसील कार्यालयातून अवैधरित्या काम करणारे सर्व कोतवाल होणार हद्दपार.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 15, 2022

तहसील कार्यालयातून अवैधरित्या काम करणारे सर्व कोतवाल होणार हद्दपार....

तहसील कार्यालयातून अवैधरित्या काम करणारे सर्व कोतवाल होणार हद्दपार....
माळशिरस:- तहसील कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचार व त्याबाबत येणाऱ्या तक्रारी नित्याचीच बाब झाली आहे, तर काही नागरिकांनी केलेल्या तक्रारी वरून तहसील कार्यालयातील अवैधरित्या काम करणारे सर्व कोतवाल तहसील कार्यालयातून हद्दपार करण्यासाठी कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी विजय देशमुख यांनी सचिन रणदिवे बाबासाहेब शेंडगे,वाल्मिक रणदिवे यांच्या निवेदनाची घेतली दखल घेतली,माळशिरस येथील सचिन रणदिवे जिल्हाध्यक्ष , माहिती सेवाभावी संस्था सोलापूर व सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शेंडगे, वाल्मीक रणदिवे यांनी दिनांक-८/०२/२०२२ रोजी तक्रारी अर्ज उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलुज यांना देण्यात आला होता.सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले होते जावेद मणेरी हे कोतवाल पुरंदावडे , येळीव या ठिकाणाचे कोतवाल असुन त्यांना तहसिल
कार्यालय माळशिरस येथील सक्षम अधिकारी मा.
तहसिलदार यांचे डोंगल हाताळतांना दिसुन येत
आहे , गेली सात वर्षापासुन जावेद मणेरी हे एकाच पदावर तहसिल कार्यालय माळशिरस या ठिकाणी काम करीत आहेत . कोतवाल भरती झाल्यापासुन ते गैरहजर आहेत , ते गैरहजर असल्याबाबतचे ग्रामसभेचे ठराव असुनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही . या सर्व प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, तसेच शासन परिपत्रक दिनांक १८ जानेवारी २०१९ नुसार कोतवालाच्या सेवा वरिष्ठ कार्यालयात संलग्नित न करता संबंधित त्या - त्या सजा कार्यालयास त्वरीत वर्ग करण्याबाबतच्या परिपत्रकानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करुन, महा ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडुन विविध प्रकारचे किती दाखले तहसिल कार्यालयास प्राप्त झाले व त्यांना वेळेवर दाखले परत मिळाले का ? याची खातेनिहाय चौकशी करावी, इ. मागणी करण्यात आली आहे तरी संबंधित निवेदनाची दखल घेत पुरंदावडे कोतवाल आणि तहसिल कार्यालयामधील वेगवगळ्या गावचे कोतवाल यांना त्यांचे मुळ सजाचे ठिकाणी कामकाज करणेकामी
तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे. तसेच अर्जदार
यांच्या अर्जाची प्रत यासोबत जोडुन पाठविण्यात
आलेली असुन , सदर अर्जामध्ये नमूद केलेल्या
मुद्दांबाबतची सविस्तर चौकशी करण्यात यावी व
नियमानुसार योग्य ती कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असा आदेश कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी विजय देशमुख यांनी काढला आहे.या आदेशाने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment