चक्क..पोलीस उपनिरीक्षकाला कुख्यात गुन्हेगाराकडून जीवे मारण्याची धमकी.. भुसावळ :- महाराष्ट्रात सद्या पोलिसांची कामात होत असणारी धगधग पाहता व कामाचा ताण या मुळे परेशान झालेला पोलीस वर्ग व त्यातच त्यांच्यावर होत असलेले हल्ले हे निंदनीय आहे अशीच घटना भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिराजवळ टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या हेतून
पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आणि करणी सेनेचा खान्देश अध्यक्ष निखिल राजपूत व त्याच्या टोळीन एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार 27 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी
पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर निखिल राजपूत हा फरार झाला होता. पोलिसांनी निखिल राजपूतसह 8 जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला. मात्र आरोपी निखिल पोलिसांना सापडत नव्हता. दरम्यान,निखील राजपूत हा श्रीरामनगर येथील त्याच्या घरी आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी निखिल याला आज (सोमवार) सकाळी अटक केली. त्यानंतर त्याची धिंड काढून त्याला पोलीस ठाण्यात आणण्यातआले. भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक महेश भास्कर घायतड हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास श्रीराम नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिराजवळ निखिल राजपूत, अक्षय न्हावकर उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील अभिषेक शर्मा, निलेश ठाकूर आणि आणखी एक अज्ञात व्यक्तीने महेश घायतड यांच्यावर हल्ला केला. घायतड यांचा गळादाबून त्यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. यातील चौघांना वांजोळा रोड परिसरातून अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निखिल राजपूत हा फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
No comments:
Post a Comment