लक्ष्मी कन्यारत्न आगमनाचे पारंपरिक वाद्याच्या गजरात स्वागत..
लोणी धामणी ता.२१/२/२०२2प्रतिनिधी - (कैलास गायकवाड):- लोणी ता. आंबेगाव. येथील माजी सरपंच सावळीराम आबाजी नाईक आंबेगाव तालुका रामोशी संघटनेचे अध्यक्ष. यांच्या कुटुंबामध्ये, मुलगा अनिकेत सुन मोनिका यांच्या पोटी मुलगी जन्माला आली. मुलगी झाली या आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात व फुलांच्या पायघड्या रांगोळी घालून, गावच्या वेशी मध्ये आकर्षक कमान करून नातीचे जंगी स्वागत केले. घरामध्ये ४० वर्षानंतर.मुलीचा जन्म झाला. या आनंदात त्यांनी गावात पेढे वाटले कुटुंबात सर्वांना आनंद झाला. मुलीच्या बारावी च्या दिवशी२/३/२०२२रोजी गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आयोजित केला असून, त्या दिवशी नातीच्या आगमना निमित्य स्नेहभोजन आयोजित केले आहे.
No comments:
Post a Comment