*महाराष्ट्राच्या ५५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ*
*मानवतेची सेवा हाच परम धर्म होय !*
*- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज*
बारामती (प्रतिनिधी) - ‘संतांच्या हृदयात सर्वांच्या भल्याची कामना असते. त्यांचे प्रत्येक कर्म मानवतेच्या भल्यासाठी घडत असते. संत स्वत:ला ईश्वराच्या प्रति समर्पित करुन कोणाला मदत करण्याची भावना नव्हे तर निष्काम भावनेने मानवतेची सेवा करणे यालाच परम धर्म मानतात.’ असे उदगार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 55व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा विधिवत शुभारंभ करताना दि.11 फेब्रुवारी, रोजी मानवतेच्या नावे दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केले.
संत निरंकारी सत्संग भवन, माहुल रोड, चेंबूर व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात आलेल्या या संत समागमाचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) संत निरंकारी मिशनची वेबसाईट www.nirankari.org आणि साधना टी.वी.चॅनलच्या माध्यमातून केले जात आहे ज्याचा आनंद महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि विदेशामधील लक्षावधी भाविक-भक्तगण घरबसल्या प्राप्त करत आहेत.
सत्गुरू माता सुदीक्षाजी पुढे म्हणाल्या, की जगामध्ये आपण मानव रूपामध्ये आलो आहोत तेव्हा एक वैश्विक नागरिक या नात्याने आपण प्रथम स्वत:ला सावरून समाजासाठी आणि अखिल मानवतेसाठी आपले योगदान द्यायला हवे. स्वत:पासून सुरवात करुन आपले कुटुंब, आपली वसाहत, आपले शहर, आपले राज्य, आपला देश आणि संपूर्ण विश्वासाठी योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे.
समागमाच्या प्रथम दिवशी सत्संग समारोहाच्या शेवटी जगभरातील भाविक भक्तगणांना आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की अपरिवर्तनशील परमात्माच विश्वास ठेवण्या योग्य आहे. बाकी समस्त जगत पसारा हा क्षणभंगूर आहे. समस्त वेद, ग्रंथ, शास्त्रांनी याच परम सत्याचा उद्घोष केला आहे. हा सत्य ईश्वर सदोदित एकरस राहतो, त्याच्यामध्ये कोणत्याही काळी काहीही परिवर्तन होऊ शकत नाही. मग या ईश्वराला कोणत्याही नावाने संबोधित केले तरी काही फरक पडत नाही. अशा या परमसत्यावर विश्वास हाच यथार्थ विश्वास होय.
सद्गुरु माताजींनी एका उदाहरणाद्वारे समजावले, की एका बालकाला आपल्या मातेने तयार केलेले भोजन अत्यंत स्वादिष्ट असते असा ठाम विश्वास होता. त्या मुलाने आपल्या शाळेतील सवंगड्यांना सांगितले, की माझ्या आईने तयार केलेले जेवण फारच स्वादिष्ट असते आणि आईने दिलेल्या जेवणाच्या डब्यातील पदार्थ चाखून न पाहताच त्याने सर्व मित्रांना त्याचा स्वाद घेण्यासाठी आमंत्रित केले. भोजन ग्रहण करुन सर्व मुले खरोखरच हे भोजन स्वादिष्ट आहे अशी ग्वाही देतात. हा त्या मुलाचा आपल्या आईवरील ठाम विश्वास आहे. आपणही परमात्म्याच्या प्रति पूर्ण समर्पित होतो तेव्हा आपल्या मनामध्येही असाच दृढ विश्वास निर्माण होतो.
संत समागमाच्या दरम्यान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘विश्वास, भक्ति, आनंद’ शीर्षक असलेल्या वार्षिक स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि नेपाळी भाषांतील आध्यात्मिक लेखांचा समावेश आहे.
या प्रसंगी समागम समितीचे सदस्य आणि स्थानिक प्रबंधकगण यांनी समस्त भक्तगणांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सद्गुरु माताजींचे हार्दिक स्वागत केले.
हा संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित केला गेला असला तरी यामध्ये विविध भाषेतील वक्तागण आपापले भाव अपने भाव विचार, भक्तिसंगीत आणि कविता यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त करत आहेत जे जनसामान्यांसाठी प्रेरणादायक ठरत असून अनेकतेत एकतेचे सुंदर चित्र प्रस्तुत करत आहेत. त्याचबरोबर ईश्वराच्या प्रति श्रद्धा, विश्वास आणि भक्तीभावनेला सदृढ करणाऱ्या या शुद्ध भावना प्रेक्षकांना अलौकिक आनंदाची अनुभूती प्रदान करत आहेत.
No comments:
Post a Comment