बाबा हरदेव सिंहजी महाराजांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र चिकित्सा शिबीर* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 22, 2022

बाबा हरदेव सिंहजी महाराजांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र चिकित्सा शिबीर*

*बाबा हरदेव सिंहजी महाराजांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र चिकित्सा शिबीर*

   फलटण :- संत निरंकारी मिशनद्वारा बाबा हरदेव सिंह जीच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतभर शंभराहून जास्त निरंकारी सत्संग भवनांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फलटण येथील संत निरंकारी सत्संग भवनात उद्या २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याची नाव नोंदणी सकाळी ८ ते १० या वेळात सत्संग भवन फलटण येथे करण्यात येईल.
    सदर शिबीर सिव्हिल हॉस्पिटल फलटण ही टीम नेत्र तपासणी करण्याचे काम करणार आहे. डोळ्यांचे दोष असणारे किंवा मोतीबिंदूंच्या रुग्णांवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन केले जाणार आहे.
     कोरोना काळात जेव्हा संपूर्ण भारतातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू लागली तेव्हा मिशन तर्फे "वननेस वन" उपक्रमांतर्गत २१ ऑगस्ट २०२१ रोजी संपूर्ण भारतभर जवळ जवळ ३५० ठिकाणी दीड लाख वृक्ष लावण्यात आली आणि त्यांच्या पालनपोषणाचा संकल्पही केला गेला आहे. या अभियानाला पुढे नेत मिशनच्या सेवादारांद्वारा आजच्या दिवशी ५० लाख वृक्ष लावण्यात येतील व त्यांची देखभाल केली जाईल.
निरंकारी मिशन नेहमीच मानव कल्याण सेवेत अग्रेसर राहिलेली आहे ज्यामध्ये मुख्यतः स्वास्थ्य, शिक्षण तसेच सशक्तीकरण साठी सेवा केली गेली आहे आणि तीच सेवा निरंतर चालू आहे. या दिवशी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
   सदर नेत्रचिकित्सा शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment