पी एम पी एम एल बस सेवा सुरू करण्यात आली असून ती सेवा पुढे चालू ठेवण्याची केली मागणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 3, 2022

पी एम पी एम एल बस सेवा सुरू करण्यात आली असून ती सेवा पुढे चालू ठेवण्याची केली मागणी..

निरगुडसर :( प्रतिनिधी.प्रा. अरुण गोरडे)दिः०३/०२/२०२२.ग्रामीण भागातील प्रवाशांचे मुख्य साधन असलेली एस टी बस सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, प्रवासी, नोकरदार, शेतकरी व विद्यार्थी वर्ग यांना प्रवासासाठी गैरसोय होत असून पुणे महानगर परिवहन महामंडळाने पारगाव ( शिंगवे ) पर्यंत पीएमपीएमएल बस सेवा सुरू करावी अशी मागणी पारगाव, काठापूर बुद्रुक, शिंगवे, जारकरवाडी, लोणी, लाखणगाव येथील ग्रामस्थांनी केली असून याबाबत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांना निवेदन दिले आहे.
   पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पाबळ व मंचर पर्यंत पी एम पी एम एल बस सेवा सुरू करण्यात आली असून ती सेवा पुढे वाढवून अवसरी मार्गे पारगाव भीमाशंकर साखर कारखाना पर्यंत सुरु करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, जारकरवाडीच्या सरपंच ॲड. रूपाली भोजने, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर आस्वारे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप लोखंडे, निवृत्ती ढोबळे, लक्ष्मण भांड यांनी दिले असून याबाबत लवकरच या मार्गाचे सर्वेक्षण करून बस सेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन मिश्रा यांनी शिष्टमंडळास दिले आहे.

No comments:

Post a Comment