लग्नाच्या आमिषाने तरूणीवर बलात्कार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल...
पुणे : पोलीस जनतेचं रक्षण करतात तर काही ठराविक पोलीस भक्षण करतात याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहे यामुळे चांगले काम करणारे पोलिसाच मनोबल खचल जातं अशीच घटना नुकताच घडली लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करुन नंतर लग्नास नकार देणाऱ्या पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमिज मुल्ला(वय ३०, रा.
शिवाजीनगर पोलीस लाईन - असे या पोलीस अंमलदाराचे कोंढव्यातील एका ३० वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी हा प्रकार लवासा , लोणावळा
पासून ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस अंमलदार रमिज मुल्ला हा सध्या कोंढवा पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे.त्याने कोंढव्यातील एका तरुणीला लग्नाचे
आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी
घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक
संबंध केले.त्यानंतर लग्नास नकार दिला. सर्व ठिकाणी फिर्यादीला ही माझी बायको, असे सांगून फिर्यादी यांची बदनामी केली.त्यामुळे त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment