धक्कादायक..पोलीस आहे म्हणून महिलेवर
बलात्कार..तर जबरदस्तीने केला गर्भपात.!
पिंपरी : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनावट पोलीस असल्याचे सांगून रस्त्यात गाड्या अडवून लूट केली जाते तर अनेकांची फसवणूक देखील केली आहे यासारखे अनेक विचित्र प्रकार घडत असताना नुकताच पोलीस असल्याचे सांगून मुलीसोबत एकट्या राहणार्या महिलेवर
बलात्कार केला. एवढेच नाही तर गरोदर राहिलेल्या महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. याबाबत भोसरी पोलीस एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2020 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीत साखरेवस्ती, भोसरी आणि हिंजवडी फेज वन येथे घडला आहे. आकाश प्रकाश पांढरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित
महिला ही त्यांच्या मुलीसोबत भोसरी परिसरात
राहतात. त्या एकट्या राहत असल्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. आरोपी आकाश याने आपण पोलीस असल्याचे सांगून महिलेला धमकावले. तू एकटी कशी राहतेस बघतो असे म्हणून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने
महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार शारीरिक संबंध व अनैसर्गिक संबध ठेवले. महिला गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर
आरोपीने फिर्यादीला गर्भपाताच्या गोळ्या
खायला घालून गर्भपात केला. असे फिर्यादीत
म्हटले आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक
पूजा कदम करीत आहेत.
No comments:
Post a Comment