बारामतीत महावितरण अभियंताची गळफास घेऊन आत्महत्या... बारामती:- बारामती शहरात महावितरण अभियंता ची स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली,बारामती शहर पोलिसांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली की महावितरण सहाय्यक अभियंता मनीष माधवराव दंडवते वय 43 वर्ष हे दोन दिवसापासून कामावर आले नव्हते व ते राहण्यासाठी वर्ग दोन बिल्डिंग फ्लॅट नंबर A6 तिसरा मजला उर्जा भवन कर्मचारी वसाहत येथे राहण्यास होते त्यांनी सकाळी त्यांचा डबेवाला त्यांना डबा देण्यात आला असता त्यांनी दरवाजा उघडला नाही दरवाजा ते उघडत नसल्याने त्यांनी तावदान आतून डोकावून आत पाहिले असता त्यांनी किचनमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेतलेली त्यांच्या निदर्शनास आले नंतर त्यांनी पोलिस ठाण्यामध्ये खबर दिली असता त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक , पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी जाऊन पाहणी केली असता दरवाजा आतून बंद होता त्यानंतर दरवाजा तोडून दोन पंचांसमक्ष पंचनामा करून प्रेत खाली उतरून शवविच्छेदनासाठी सिल्वर ज्युबिली याठिकाणी पाठवण्यात आले सदर अभियंता हे सदर ठिकाणी कुटुंबा शिवाय राहत होते त्यांचे कुटुंबीय सोलापूर या ठिकाणी राहण्यास होते सदर बाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आलेली आहे दंडवते यांनी आत्महत्या का केली याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही
Post Top Ad
Saturday, February 5, 2022
बारामतीत महावितरण अभियंताची गळफास घेऊन आत्महत्या...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment