*साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार प्रथम वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 20, 2022

*साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार प्रथम वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..*

*साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार प्रथम वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..*                                                                                                                 वालचंदनगर विशेष प्रतिनिधी:- वालचंदनगर येथे दिनांक 19 /2 /2019 रोजी साप्ताहिक रयतेचा भीमप्रहार या वृत्तपत्राचा प्रथम वर्धापनदिन व विशेषांक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपति बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीरयोद्धामाता सावित्रीमाई उबाळे शहीद पंचायत समिती सदस्य राजदत्त उबाळे यांच्या प्रतिमेचे पुजन धूप व दिपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्याच बरोबर बारामती गावचे सुपुत्र शहीद जवान अशोक इंगवले व कालकथित सावित्रीमाई भागवत उबाळे यांना सर्वांनी उभे राहून दोन मिनिटांची आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी साप्ताहिक रयतेचा भिमप्रहार चे मालक प्रकाशक व मुख्य संपादक भीमसेन सर्जेराव उबाळे सर यांनी आपले मनोगत व साप्ताहिकाचे उद्दिष्ट व धोरण आपल्या प्रस्ताविकमध्ये सविस्तर मांडले यानंतर राज्यमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री भगवानराव वैराट  संस्थापक-अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती मध्ये विरसिंहभैया रणसिंग तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या सर्व सर्व उपस्थित विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे व पत्रकारांचे तसेच मंत्री महोदयांच्या सर्व स्वीय सहाय्यक यांचे तसेच परिसरातील विविध आशा वर्कर तसेच इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणच्या अंगणवाडी सेविका डॉक्टर्स सामाजिक कार्यकर्ते यांचा महाराष्ट्रातील प्रथमच कोरोना प्रतियोद्धा या विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा पुरस्कारार्थी यांचे हस्ते राज्यस्तरीय विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले  यावेळी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत वीरसिंह रणसिंग, योगेश नालंदे,नानासाहेब साळवे ,अंगणवाडीसेविका अध्यक्ष सौ पुनम निंबाळकर सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले यांनी साहित्यिक तथा शेवराई सेवा संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव भोसले यांनी आपली सामाजिक व्यथा मांडत साप्ताहिक  रयतेचा भीमप्रहार आपल्या अंकामध्ये वाट मोकळी करून देतात या भावना व्यक्त केल्या आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले वैराट साहेबांनी पत्रकारितेचे पूर्वीचे व आजचे सविस्तर विश्लेषण आपले मनोगत मांडले तसेच शिवजयंती ही वैचारिक पातळीवर साजरी झाली पाहिजे ती आज खऱ्या अर्थाने साप्ताहिक रयतेचा भिम प्रहार च्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून वैचारिक पातळीवर साजरी होत आहे त्यानंतर राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे यांनी त्यांचे मनोगता मध्ये म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने उबाळे कुटुंबियांचा स्वाभिमानाचा व सामाजिक कार्याचा आदर्श घ्यावा तसेच पत्रकार संपादक भीमसेन उबाळे सर हे आपल्या साप्ताहिक रयतेचा भिमप्रहार माध्यमातून समाजाच्या व्यथा तसेच काय चूक काय बरोबर हे आपल्या लेखणीतून सडेतोडपणे सातत्याने मांडत असतात तसेच समाजाला एक नवीन दिशा देण्याचे तळमळीने प्रयत्न करीत असतात असे मत विचार मंचावरून नामदार दत्तामामा भरणे यांनी व्यक्त केले. साप्ताहिक रयतेचा भिम प्रहार प्रथम वर्धापन दिनानिमित्त तसेच विशेषांक प्रकाशन सोहळा व सावित्रीमाई उबाळे यांच्या स्मरणार्थ विशेष पुरस्कार घेण्यात आले त्यामध्ये लेखनरत्न पुरस्कार प्रकाश काले, अभिनयरत्न अभिनेता-दिग्दर्शक शिवकुमार गुणवरे, विद्यार्थीरत्न कुमारी प्रतीक्षा पाटील  योगासनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, व्यवसायरत्न हॉटेल व्यावसायिक कासमभाई कुरेशी, युवकरत्न मा स्वप्नील सावंत काँग्रेस अध्यक्ष इंदापूर तालुका ,उद्योगरत्न बाबासाहेब गायकवाड मुक्ताई उद्योगसमूह, अं विशेष सरकारी वकील उस्मानाबाद नियुक्तीबद्दल एडवोकेट अमोल सोनवणे विकासरत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय श्री दत्ता मामा भरणे तसेच सत्कार आशा वर्कर अंगणवाडी सेविका, डॉक्टर, पत्रकार यांचा कोरोना प्रतियोद्धा या विशेष पुरस्काराने त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला यावेळी  मा.जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,रा.युवक अध्यक्ष  शुभम निंबाळकर,पुणे नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकळ.सुरज वन साळे, डॉ राजेश कांबळे,डॉ हेगडकर,प्रा.अरून कांबळे, प्रा.हनुमंत कुंभार, प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर तसेच उधोजक कासम भाई कुरेशी, त्याचबरोबर पत्रकार संतोष जाधव, तानाजी पाथरकर,योगेश नालदे, स्वप्नील कांबळे,नानासाहेब साळवे, गौरव अहिवळे व इतर मान्यवर उपस्थित होते   कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमसेन उबाळे सर यांनी केले सूत्रसंचालन निलेश धापटे व पत्रकार तानाजी पाथरकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार एम व्ही पवार सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संपादक भीमसेन उबाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पवार सर काजल भोसले मॅडम, हर्षवर्धन उबाळे विश्वराज उबाळे अभिराज उबाळे, तसेच सर्व ठिकाणच्या तालुका व गाव प्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment