कुणी ऐकताय का..उपविभागाला पूर्णवेळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता कधी मिळणार ? बारामती:-बारामती शहर उपविभागाला पूर्णवेळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता कधी मिळणार , गेल्या वर्षभरापासून जागा रिक्त : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्य अभियंत्यांना सवाल करत दिले निवेदन,बारामती शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची बदली होऊन जवळपास एक वर्ष होत आले परंतु तरीदेखील सदर जागा अद्यापही रिक्त आहे .महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गावात पूर्णवेळ अभियंता मिळत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
त्यामुळे लवकरात लवकर बारामती शहराला पूर्णवेळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिळावा , अशी मागणी आज मनसेने केली .त्याच बरोबर महाराष्ट्र शासनाच्या बदली संदर्भातले नियम व अटी ही फक्त काही ठराविकच अधिकाऱ्यांना लागू होते का ? इतरांसाठी काही वेगळे नियम आहेत का ? जर अशा प्रकारचे नियम काही अधिकाऱ्यांसाठी असतील तर त्या संदर्भातील लेखी खुलासा आपण लवकरात लवकर करावा अशी देखील मागणी करण्यात आली .महाराष्ट्र शासनाचे बदली संदर्भातील नियम व अटी यातील पळवाटा शोधून काही ठराविक अधिकारी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून बारामती शहर उपविभाग व बारामती ग्रामीण उपविभाग यामध्ये वर्षानुवर्ष बदली न होता तशाच पद्धतीने कार्यरत आहेत .या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन शासनाचे नियम मोडणार्या अधिकार्यांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्य कार्यकारी अभियंता माननीय श्री पावडे साहेब यांना दिले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारामतीचे तालुकाध्यक्ष ॲड.श्री निलेश वाबळे ,बारामती शहर उपाध्यक्ष स्वप्नीलभैया मोरे, अमोलशेठ गालिंदे ,प्रवीणभाऊ धनराळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment