शारदाबाई पवार विद्या निकेतन शारदानगर या शाळेला निर्भय कन्या अभियाना अंतर्गत भेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 23, 2022

शारदाबाई पवार विद्या निकेतन शारदानगर या शाळेला निर्भय कन्या अभियाना अंतर्गत भेट..

शारदाबाई पवार विद्या निकेतन शारदानगर या शाळेला निर्भय कन्या अभियाना अंतर्गत भेट..                                                           बारामती:-आज रोजी बारामती निर्भया पथकाने बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत शारदाबाई पवार विद्या निकेतन शारदानगर या शाळेला निर्भय कन्या अभियाना अंतर्गत भेट देऊन शाळेमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना निर्भया पथक निर्भया पेटी प्रत्येक शाळेवर बसवलेले असून त्यामध्ये आपल्या अडचणी लिहून टाकायचे आहेत निर्भया सखी म्हणजे आपल्या शाळेतील दोन विद्यार्थिनी पोलिसांच्या निर्भया सखी असतील त्या शाळेतील मुलींना येणाऱ्या अडचणी पोलिसांपर्यंत पोहोचवतील गुड टच बॅड टच म्हणजे काय ते कोण करते किशोर वयामध्ये मुला मुलींना येणाऱ्या अडचणी त्यांच्या समस्या पोक्सो कायदा छोट्या मुलांविषयी घडलेल्या गुन्ह्यांची उदाहरणासहित माहिती दिली स्वसंरक्षण त्यामध्ये पोहणे गाडी चालवणे कराटे इत्यादी गोष्टी आत्मसात करणे, आपल्या आयुष्यातील आपल्या आईवडिलांचे स्थान गुरुवर्य यांचे स्थान आपले आदर्श आपले गुरु आई वडील असावेत आपली आई आपली मैत्रीण असावी कुटुंबासोबत संवाद लहान वयात दाखल होणारे गुन्हे बालगुन्हेगारी आपली संगत कशी असावी वाहतुकीचे नियम शिस्तीत व सुरक्षित जीवन जगावे व गरज लागल्यास पोलिसांची मदत घ्यावी त्यामध्ये 100/1091/112 यावरती संपर्क साधने बाबत कळविले आपले स्वतःचे संरक्षण ही आपली स्वतःची जबाबदारी असून त्याप्रमाणे शिस्तप्रिय जीवन जगावे असे वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य मुंडे सर गवळी मॅडम कातोरे सर, विजयसिंह घाडगे सर निर्भया पथकाचे महिला पोलीस हवालदार अमृता भोईटे महिला पोलीस हवालदार अंजली नागरगोजे महिला पोलीस कॉन्स्टेबल सुप्रिया कांबळे महिला पोलीस कॉन्स्टेबल भोईटे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे असे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment