मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न.. बारामती:- छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून त्यांचे विचार डोक्यात घेऊन रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा विषय आहे. ढाल-तलवारी पलीकडचे शिवराय शिवप्रेमींना समजावे या उद्देशाने घाडगेवाडी येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी प्रसिद्ध व्याख्यात्या ॲड.वैशाली डोळस यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मराठा सेवा संघाचे बारामती तालुका अध्यक्ष प्रा.गोविंद वाघ यांनी जिजाऊ वंदना म्हणून केली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच, शनिवारी सकाळी शिवजयंती निमित्त राजमाता जिजाऊ चौकात उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने शिवपुजन करून शिवप्रेमींना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके वितरित करण्यात आली. या प्रसंगी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, संघटक विशाल भगत, घाडगेवाडी शाखा उपाध्यक्ष कार्तिक काकडे, खजिनदार अभिजीत बळीप, प्रशांत काकडे, अमित चव्हाण, रणजित तुपे, अंकुश पवार, लालासो तुपे, विठ्ठल वाघ, पुंडलिक शिंदे, आप्पासो वाघ, हिरोजी साबळे, शुभजीत कोकरे, सुमित भोसले, रमेश साबळे इत्यादी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Top Ad
Saturday, February 19, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न..
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment