बारामतीतील मुनीरभाई आतार यांचा अपघाती मृत्यू तर ६ जखमी,नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना कारचा झाला होता अपघात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 21, 2022

बारामतीतील मुनीरभाई आतार यांचा अपघाती मृत्यू तर ६ जखमी,नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना कारचा झाला होता अपघात..

बारामतीतील मुनीरभाई आतार यांचा अपघाती मृत्यू तर ६ जखमी,नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना कारचा झाला होता अपघात..

बारामती :बारामती मधील सर्व परिचित मुस्लिम समाजाचे सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते मुनीरभाई आतारयांच्यावर काळाने घाला घातला ही दुःखद बातमी बारामतीत हळहळ व जिव्हारी लागली याबाबत माहिती अशी की, बारामतीवरून शेवगाव येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना पैठण-बारामती रोडवर आज दुपारी कार आणि जीपची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य सहा जण जखमी झाले. मुनीरभाई हाजीर आतार ( ७०) असे मृताचे नाव असून हा अपघात आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथे झाला.बारामती येथील रहवाशी असलेले आतार कुटुंबातील सदस्यासह शेवगांव येथील पाहुण्याच्या अंत्यविधीसाठी कारमध्ये (क्रमांक एम.एच. १४, बी.सी.८१५७ ) जात
होते. दुपारी अडीजवाजेच्या सुमारास पैठण-बारामती रोडवरील देवीनिमगाव येथील वळणावर कार आणि धामणगांववरून कड्याकडे येत असलेली जीपची (क्रमांक एम.एच. ४२ ए.एस. ४७५५) समोरासमोर धडक झाली.अपघातात कारमधील मुनीरभाई आतार यांचा जागीच
मृत्यू झाला. तर कारमधील मुलगा, सुन, भाची, नातू आणि जीपचा चालक व अन्य एक असे सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर कडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment