छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साही व आनंदी वातावरणात साजरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साही व आनंदी वातावरणात साजरी..

निरगुडसर : प्रतिनिधी. (प्रा. अरुण गोरडे.)दि :१९/०२/२०२२.निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पं.ज.नेहरू माध्यमिक व द.गो. वळसे पाटील उच्च माध्यामिक विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साही व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील,निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील,माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील,प्राचार्या सुनंदा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी वैभवी वळसे व आर्या गोरे या दोन मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला पर्यवेक्षक संतोष वळसे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन दरेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment