धक्कादायक...जबरी चोरी अन खंडणी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

धक्कादायक...जबरी चोरी अन खंडणी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल..

धक्कादायक...जबरी चोरी अन खंडणी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल..

 मुंबई : धक्कादायक प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली याबाबत मिळालेली माहिती अशी की, कारवाई करण्याच्या नावाखील अंगडीयाचा व्यापार करणार्यांना आयकर विभागाची भीती दाखवून पोलिसांनी पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुंबई पोलीस दलातील
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात आज (शनिवार) गुन्हा दाखल करण्यात आला  पोलिसांविरुद्ध उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने मुंबई
पोलीस  दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक ओम वंगाटे , पोलीस निरीक्षक नितीन कदम , पोलीस उपनिरीक्षक समाधान यांच्यासह इतरांवर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 चे अधिनियमांतर्गत कलम 392, 384,341,34
अन्वरये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग मुंबई दिलीप रघुनाथ सावंत याबाबत (वय-57) यांनी फिर्याद दिली आहे. अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग दिलीप सावंत यांच्या अंतर्गत 18 पोलीस स्टेशन येतात. 7 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील भुलेश्वर येथील अंगडीया
असोसिएशनचे योगेशभाई गांधी जतीन शहा , मधुसूदन रावल यांनी दिलीप सावंत यांची भेट घेऊन लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अमंलदार यांच्याकडून होणार्या त्रासाबाबत लेखी तक्रार दिली होती.त्यामध्ये त्यांनी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पोफळवाडी परिसरात ज्यांच्या बॅगेत पैसे असतील त्यांना मुंबादेवी पोलीस चौकीत नेऊन पैसे उकळल्याची तक्रार दिली होती.तसेच यामध्ये पोलीस निरीक्षक वंगाटे यांच्या नावाचा उल्लेख केला होता प्राथमिक तपासात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम,पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे व इतर
अंमलदार यांनी 2,3,4 व 6 डिसेंबर 2021
रोजी पोफळवाडी परिसरातील अंगडीया
व्यापार करणार्यांना आयकर विभागाची भीती दाखवून पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले.तसेच पोलिसांची वागणूक आणि पोलीस
ठाण्यातील नोंदी यामध्ये तफावत आढळून आली.तसेच पोलीस निरीक्षक वंगाटे यांच्या आदेशानुसार कारवाई केल्याचे सहायक पोलीस
निरीक्षक कदम आणि पोलीस उपनिरीक्षक
जमदाडे यांनी त्यांच्या जबाबात सांगितले.एकंदरीत केलेल्या चौकशीमध्ये 2, 3, 4 व 6 डिसेंबर 2021 या दिवशी पोलीस निरीक्षक
ओम वंगाटे,सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम,पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे व
इतरांनी पोफळवाडी परिसरात संशयितांवर
कारवाई करण्याच्या नावाखाली अंगडीया
व्यापार करणार्यांना बेकायदेशीररित्या अटकाव
करुन त्यांच्या व्यवहाराची माहिती आयकर
विभागाला देण्याची भीती घालून त्यांच्याकडून
जबरदस्तीने पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले.तिघांवर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment