लोणी येथे महाशिवरात्र निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
लोणी धामणी प्रतिनिधी - (कैलास गायकवाड) ता.२२/२/२०२२ लोणी ता. आंबेगाव येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. आज सकाळी होम वन, सत्यनारायणाची महापूजा प्रवचन, हरिपाठ, कीर्तन व जागर, आठ वाजता महाप्रसादाचे आयोजनअसं वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे.
तसेच उद्या पासून पहाटे पाच ते सहा काकडा,सायंकाळी पाच ते सहा प्रवचन, सहा ते सात हरिपाठ आठ ते दहा किर्तन आसा साप्ताहिक कार्यक्रम आहे. सप्ताहात भाऊसाहेब लोखंडे, किसन महाराज तांबे,उज्वलाताई सुक्रे, श्रीराम महाराज वाळुंज, हिरामण महाराज कर्डिले, वैभव महाराज शिंदे, दत्तात्रय महाराज शिनलकर, बबन महाराज शिनलकर यांची प्रवचने आहेत. प्रसिद्ध कीर्तनकार हभप उद्धव महाराज वडूलेककर, ह भ प पुंडलिक महाराज नागवडे, ह भ प आसाराम महाराज बडे, ह भ प संत दास महाराज मनसुख, हभप प्रमोद महाराज जगताप, ह भ प एकनाथ महाराज सदगीर, ह भ प ज्ञानेश्वर महाराज कदम, ह भ प विश्वनाथ महाराज रिठे, तसेच काल्याचे किर्तन ह भ प ज्ञानेश्वर महाराज पठाडे बीड यांची कीर्तन सेवा होणार आहेत. सप्ताह काळात रोज महाप्रसादाचे आयोजन केले आहे. किर्तन सेवेनंतर रोज रात्री जागर राहणार आहे.परिसरातील नामांकित भजनी मंडळ यांचा सहभाग असेल, मंदिरा चे रंग काम करावयाचे असून, ग्रामस्थांनी बैलगाडा घाटासाठी व मंदिराचा रंग कामासाठी देणगी रूपाने मदत करावी असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. मृदंग वादक ह भ प कैलास महाराज सुक्रे व ह भ प अजित महाराज लोखंडे यांचे मृदंग वादन राहणार आहे सदर सप्ताह चे नियोजन ह भ प बबन महाराज शिनलकर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. तरी सर्व परमार्थिक भाविक भक्तांनी सप्ताहाचा लाभ घ्यावा. असे आव्हान लोणी ग्रामस्थांनी केले आहे.
No comments:
Post a Comment