बारामती मधे वनविभागाचा कारभार.. जोशी समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 22, 2022

बारामती मधे वनविभागाचा कारभार.. जोशी समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन..

बारामती मधे वनविभागाचा कारभार..  
जोशी समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन.. 
बारामती:- समस्त जोशी समाज जळोची यांचे वतीने, वन विभागाच बारामती कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन चालु,गाव मौजे कन्हेरी गट नं 293 मधे, किशोर हंसराज पाचंगे यांचे आजोबा यांना तत्कालिन तहसीलदार *रा_तु_गटकळ*  यांनी 1978 साली भूमिहीन लोकांना जमीन देऊ केली होती त्यामधे दोन हेक्टर जमीन पाचंगे यांना देखील दिली होती,तसा जमीन दिलेला आदेश देखील आहे, व आज रोजी सात बारा (7/12)दफ्तरी *किशोर_हंसराज_पाचंगे*  यांची नोंद देखील आहे, असे असताना बारामती येथील वन विभागाच्या अधीकारी यांनी कोणतीही लेखी आथवा तोंडी नोटीस न देता, वनविभागाचा फौज फटा घेऊन दमदाटी करून, संपुर्ण जमीनी मधील उभा असलेल्या उसाचे पीक व ठिबक सिंचन नेस्तनाबूद करून टाकले, व सदर जमीनीचा ताबा घेतला,त्यासंदर्भात तत्कालिन वनपरिक्षेत्र अधिकारी *काळे* यांना भेटुन विचारणा केली असता त्यांनी फक्त वेळ काढु पणा केला,आणी जवळपास 6 महीने या गोर गरीब सामाजातील भटकंती करून जगणाऱ्या समाजाला झुलवत ठेवले, व बेकायदेशीर जमीनीचा ताबा घेतला आसुन ,आज रोजी त्यांच्या कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन घेण्यात आले, जमीन लवकरात लवकर परत करावी व केलेली नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या   ठिय्या आंदोलनाचे स्वरूप बदलून  आमरण उपोषणात होईल का अत्मदहनात होईल हे सांगु शकत नाही,या वेळी कारण या ठिकाणी बसुन उपाशी मरण्या पेक्षा आम्ही   आत्मदहन  करू असा इशारा अँड.अमोल सातकर यांनी दिला या वेळी राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ, प्रताप पागळे, नवनाथ मलगुंडे, शैलेश बगाडे,व मोठ्या प्रमाणावर समाजातील महीला व पुरूष उपस्थित होते व आहेत.

No comments:

Post a Comment