वडगावपीर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे दहा संचालक बिनविरोध तर दोन महिला निवडूूून आल्या.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 14, 2022

वडगावपीर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे दहा संचालक बिनविरोध तर दोन महिला निवडूूून आल्या..

 वडगावपीर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे दहा संचालक बिनविरोध तर दोन महिला निवडूूून आल्या..                                                                                                    लोणी-धामणी : प्रतिनिधी -(कैलास गायकवाड):- दिः१४/०२/२०२२. वडगावपीर ( ता.आंबेगाव) येथील वडगावपीर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे दहा संचालक बिनविरोध निवडून आले.तर दोन महिला प्रतिनिधीच्या दोन जांगासाठी निवडणूक झाली. येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहा संचालक बिनविरोध निवडून आले. सेवा सहकारी संस्थेच्या स्थापनेपासून निवडणूक बिनविरोध होत आहे. संस्थेवर 13 संचालक मंडळ असून आता पर्यंत एखादा अपवाद वगळता सर्वच निवडणूका बिनविरोध होत आल्या आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष पुरस्कृत बिनविरोध निवडून आलेले संचालक खुल्या प्रवर्गातील. दिलीप पोखरकर,पोपट राजगुडे,तुकाराम आदक, बाळासाहेब आदक, फकिरा गोविंद आदक,फकीरा ज्ञानेश्वर आदक,बापू आदक, इतर मागास प्रवर्गातून फकीरा मांदळे. अनुसुचीत जाती जमाती शांताराम सुर्यवंशी. हे बिनविरोध निवडून आले. तर महिला प्रतिनिधीची निवडणूक झाली.दोन जांगासाठी तीन महिलांनी निवडणूक लढवली. यामध्ये ५२५ पैकी २९७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.पैकी विजया एकनाथ आदक यांना २४८ तर वैयजंता किसन पालेकर पाटील यांना २४५ मते मिळाली व त्या निवडून आल्या.नंदा उत्तम रोकडे यांना ६९ मते मिळाली त्यांचा दारून पराभवाला सामोरे जावे लागले. वडगावपीर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सभासद व बँक पातळीवर दरवर्षी ३१ मार्चपूर्वी १०० टक्के वसुली होते. सभासदांना १० टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येतो. या परिसरातील एक नावाजलेली सोसायटी म्हणून ओळख आहे. या सर्व नूतन संचालक मंडाळाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत निकम यांनी अभिनंदन केले. माजी सरपंच संजय पोखरकर, रमेश आदक इतरांनी निवडणूक पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले. ________________________________

No comments:

Post a Comment