सव्वा वर्षे खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी वडगाव निंबाळकर पोलीसांनी केला जेरबंद.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

सव्वा वर्षे खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी वडगाव निंबाळकर पोलीसांनी केला जेरबंद....

सव्वा वर्षे खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी वडगाव निंबाळकर पोलीसांनी केला जेरबंद....
वडगाव निंबाळकर:- संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा १४/१२/२०२० रोजी खुनाचा गुन्हा दाखल होता, भिमा बाजीराव डोके वय २२ वर्षे, रा. धांदरफळ ता.संगमनेर जि.अहमदनगर याचा आरोपी नामे अजय मलखान तामचीकर रा.धांदरफळ ता संगमनेर जि.अहमदनगर
याने खुन करून तो सव्वा वर्षा पासुन फरारी होता. संगमनेर पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु तो मिळून येत नव्हता, त्यानंतर उपविभागीय पोलीस अधीकारी संगमनेर यांचे तपास पथकास सदर आरोपी हा वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीत राहण्यास आहे अशी माहीती मिळाल्याने सदरचे तपास पथकाने वडगाव
निंबाळकर पोलीस स्टेशन येथे येऊन सदर खुनाच्या गुन्हयातील आरोपी पकडणे कामी पोलीस मदत मागितली असता, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे यांनी सदर बाब गांभिय्याने घेऊन पो.स.ई श्री योगेश शेलार. तसेच पो.ना.नितीन बोराडे, पो.ना.अमोल भोसले यांना संगमनेर तपास पथकास योग्य ती मदत करण्याच्या सुचना दिल्या, त्यानंतर पो.स.ई श्री योगेश शेलार तसेच पो.ना.नितीन बोराडे, पो.ना.अमोल भोसले यांनी गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळवुन सदर खुनाच्या
गुन्हयातील फरारी आरोपी हा वाघळवाडी ता बारामती जि पुणे येथे राहणेस असले बाबत माहीती मिळवुन सदर आरोपी राहत असलेल्या ठिकाणी गेले असता सदर आरोपी अजय मलखान तामचीकर रा.धांदरफळ ता संगमनेर
जि.अहमदनगर हा पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यास पकडुन जेरबंद केले आहे. त्यानंतर सदर आरोपीस उपविभागीय पोलीस अधीकारी संगमनेर यांचे तपास पथकाचे ताब्यात देण्यात आला आहे.रजि नं १५२७/२०२० भा.द.वि.क.३०२ प्रमाणे दि.
सदरची कामगिरी मा.सोमनाथ लांडे , सहा. पोलीस निरीक्षक वडगाव निबांळकर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई श्री योगेश शेलार , तसेच पो.ना.नितीन बोराडे, पो.ना.अमोल भोसले तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी संगमनेर यांचे तपास पथकातील पो.हवा.लांडे ,पो.ना.दातीर, पो कॉ . आढाव, पो.का.बोडके, पो.कॉ.गाडेकर, पो.कॉ.शिंदे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment