आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेस पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रक – पूर्वाताई वळसे पाटील यांची माहिती. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 25, 2022

आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेस पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रक – पूर्वाताई वळसे पाटील यांची माहिती.

आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेस पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रक – पूर्वाताई वळसे पाटील यांची माहिती. 
**************************
निरगुडसर : प्रतिनिधी.: (प्रा.अरुण  गोरडे.) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष जयंतराव पाटील,  उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटनेचे काम सुरू आहे. मुलींना समाजकारणाचे धडे गिरवता यावे, राजकारणात वावरताना आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली. राजकारणातील तरुणींची सक्रियता समाजाला नक्कीच प्रगतीपथावर नेईल. त्या अनुषंगाने आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील युवतींचा सहभाग घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी व मजबुतीकरण करण्यासाठी आज मंचर येथे नुतन विश्वास पालेकर पाटील (अध्यक्षा, अवसरी बु-पारगाव जिल्हा परिषद गट), 
प्रियांका सचिन साबळे (अध्यक्षा, आमोंडी-शिनोली जिल्हा परिषद गट),
 सुनीता पंडित खिलारी (अध्यक्षा, कळंब – रांजणी जिल्हा परिषद गट),
 प्रतीक्षा तुषार तोत्रे (उपाध्यक्षा, पेठ – घोडेगाव जिल्हा परिषद गट), 
सुषमा दौलत शिंदे (अध्यक्षा, अवसरी खु-पंचायत समिती गण), सारिका महादेव वाघमारे (अध्यक्षा, पेठ पंचायत समिती गण), 
अमृता राहुल होनराव (उपाध्यक्षा, मंचर शहर) यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष निलेश शेळके, युवती अध्यक्ष अक्षदा शिंदे आदी उपस्थित होते.अशी माहिती पूर्वाताई वळसे पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment