*खडकवाडी येथे लोकवर्गणीतून बैलगाडा घाटाच्या कामाची दुरुस्ती*
पारगाव प्रतिनिधी( पियुष गायकवाड):-खडकवाडी ता. आंबेगाव गावचे ग्रामदैवत श्री.भैरवनाथ महाराजांच्या बैलगाडा घाटाची शासनाने दिलेल्या नियमानूसार साफसफाई व डागडुजीचे कामकाज लोकवर्गणीतून सुरू करण्याचा शुभारंभ आज रविवार दिरोजी प्रसिध्द गाडामालक,फायनल सम्राट,पै गोरक्ष दादा सासवडे यांच्या हस्ते नारळ फोडून कामास शुभारंभ करण्यात आला.यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री.नाथा आबाजी सुक्रे मा सरपंच अनिलशेठ डोके,श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक उदयशेठ डोके,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.संतोषशेठ सुक्रे, उपसरपंच एकनाथ सुक्रे,हिंदुह्रदय सम्राट प्रतिष्टाण संस्थापक गुलाब वाळुंज,ग्रामपंचायत सदस्य अदिनाथ सुक्रे,मा.चेअरमन विलासभाऊ सुक्रे,ओंकार हुंडेकरीचे मालक बाळासाहेब सुक्रे, वसंत भागवत,सामाजिक कार्यकर्ते,दत्तु बाबुराव सुक्रे,मा ग्रामपंचायत सदस्य आबाशेठ सुक्रे,सखाराम तात्या वाळुंज,सामाजिक कार्यकर्ते संतोष चंदर डोके,मा.चेअरमन बाळु धोंडीबा धुमाळ,पोलीस पाटील संपत डोके,शिवसेना शाखा प्रमुख विश्वास सुक्रे,फायनल सम्राट वैभवशेठ सुक्रे,हाॅटेल श्रीनाथचे मालक संजयशेठ वाळुंज,प्रसिद्ध गाडा मालक राहुल सुक्रे,आदेश डोके ,संतोष वाळुंज,सामाजिक कार्यकरते स्वप्निल वाळुंज,बाबाजी धुमाळ,मनोज सुक्रे,सुरज सुक्रे,नितिन पंचरास,निवॄत्ती डोके आणि ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थितीत होते.
बैल गाडा घाटासाठी बापु पडवळ आणि सुरेश शंकर वाळुंज पाटील यांनी जागा उपलब्ध करुण दिल्या बद्दल ग्रामस्थानी त्यांचे आभार मानले.सदर घाटासाठी रु 6 लक्ष अंदाजे खर्च अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment