बारामती तालुक्यातील चोरीचे सत्र काही थांबेना.. ढगाई माता मंदिरातील दानपेटीची झाली चोरी.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 20, 2022

बारामती तालुक्यातील चोरीचे सत्र काही थांबेना.. ढगाई माता मंदिरातील दानपेटीची झाली चोरी.!

बारामती तालुक्यातील चोरीचे सत्र काही थांबेना.. ढगाई माता मंदिरातील दानपेटीची झाली चोरी.!                                                        बारामती(होळ):-बारामती तालुक्यातील भक्तगणांचे श्रद्धास्थान असणारे ढगाई माता मंदिरात चोरी झाल्याची बातमी समजली याबाबत सविस्तर असे की,बारामती तालुक्यातील होळ येथील प्रसिद्ध देवस्थान अशी ओळख असलेल्या श्री. ढगाई देवी मंदिरातील दानपेटीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी
दानपेटीवर डल्ला मारण्यापूर्वी देवीचे दर्शन घेतले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे.
दरम्यान वडगाव निंबाळकर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.होळ येथे निरा नदीकाठी हे मंदिर आहे. रविवारी (दि.२०) सायंकाळी पूजा-आरती आटोपून येथील पुजारी घरी गेले. सोमवारी सकाळी ते दैनंदिन पूजेसाठी गेले असताना गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलुप तुटलेल्या
अवस्थेत दिसून आले. आतील मंदिरातील दानपेटी जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला खबर देण्यात आली. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेत दोघे चोरटे दानपेटी घेऊन जाताना दिसत आहेत. लाटे येथील पुण्यमाता आईसाहेब मंदिरातही गत
महिन्यात चोरी झाली होती. त्यानंतर पुन्हा या भागातील प्रसिद्ध ढगाई देवी मंदिरात चोरी झाल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दानपेटीत नेमकी किती
रक्कम होती, याची माहिती उपलब्ध झालेली नाही.तर नुकताच वडगाव निंबाळकर पोलीसांनी मोबाईल चोरीचा तपास लावतो नाही तोवर लगेच समोर दुसरे अवाहन उभे राहिले असून पोलीस मात्र याची कसोशीने तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment