देवगाव येथून चाळीस वर्षीय व्यक्ती बेपत्ता
लोणी धामणी - प्रतिनिधी (कैलास गायकवाड):- ता.२६/२/२०२२ देवगाव,तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. माळी वस्ती येथून दुकानातून वस्तू घेऊन येतो, म्हणून बाहेर पडलेले भाऊसाहेब बारकू सोनवणे तेथून निघून गेलेले आहेत आजूबाजूच्या परिसरात नातेवाईकांकडून कडे शोध घेतला असता,सापडले नाहीत ते कुठेतरी बेपत्ता झाले असावेत,
भाऊसाहेब बारकू सोनवणे वय ४० वर्ष धंदा ऊसतोड आदिवासी भिल्ल मुळगाव चटना पाडा,तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक,सध्या राहणार देवगाव, तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. शिक्षण नाही, रंग गोरा,उंची पाच फूट चार इंच, चेहरा गोल सरळ, केस काळे,अंगात हिरवा पांढरा रंगाचा फुल शर्ट, काळी पॅन्ट, पायात चप्पल, भाषा अहिराणी, मराठी बोलतो. अशी तक्रार मंचर पोलीस स्टेशन येथे त्याची पत्नी बायडाबाई भाऊसाहेब सोनवणे वय वर्ष ३५ मुळगाव चटना पाडा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांनी तक्रार दिली आहे.
या प्रकरणाचा तपास मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक खैरे करत आहे.
No comments:
Post a Comment