निरा बारामती रोड सोमेश्वर सोरटेवाडी नजीक सहा फाटा याठिकाणी दुचाकीचा झाडाला धडकून अपघातःएका विद्यार्थ्याचा मृत्यू तर एक जखमी...| सोरटेवाडी:- सोरटेवाडी सोमेश्वर नजीक सहा फाटा या ठिकाणी मोटारसायकल झाडाला धडकून एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच
मृत्यू झाला आहे तर एक विद्यार्थी जखमी झाला आहे.ही घटना आज सकाळी घडली असून या अपघातामध्ये सोरटेवाडी(पवार वस्ती) येथील दशरथ जाधव यांचे नातू प्रथमेश नामदेव गायकवाड(वय:१७)या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर त्याचा मित्र मयूर सोरटे हा जखमी झाला आहे. मयूर सोरटे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिली आहे.सविस्तर हकीकत अशी की प्रथमेश गायकवाड व
मयूर सोरटे हे दोन्ही विद्यार्थी सकाळी आपल्या
दुचाकीवरून सोरटेवाडी येथील शाळेत निघाले होते.शाळेत जात असताना त्यांची दुचाकी झाडावर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात दोघे जखमी झाले होते. त्यांना सोमेश्वर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले असता डॉक्टरांनी
प्रथमेश गायकवाड हा उपचारापूर्वीच मयत झाला
असल्याचे घोषीत केले तर मयूर सोरटे हा जखमी
असल्याने त्याच्यावर उपचार सुरू केले. या घटनेने सोरटेवाडी(पवारवस्ती) गावावर शोककळा पसरली आहे.तर टकारी समाजात या मुलाचा अपघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी सांगितलं की, असे वारंवार होतात कारण या ठिकाणी असणारे झाडे व समोरून येणारे जोरातची वाहने यामुळे व ऊस वाहतूक करणारी वाहने यामुळे वारंवार अपघात होतात मात्र याकडे कुणाचे लक्ष जात नाही की काही अपघात क्षेत्र म्हणून घोषित करीत नसल्याने अनेकांना जीवास मुकावे लागले लागले असल्याचे समजतंय.
No comments:
Post a Comment